*जनता शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पत संस्था मर्यादित चंद्रपूर या संस्थेची 54 वी वार्षिक आमसभा संपन्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*: दिनांक: 20/09/2026 रोजी जनता शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पत संस्था मर्यादित चंद्रपूर – स्थापना -1971 या संस्थेची 54 वी वार्षिक आमसभा श्री – लिला सभागृह, जनता बी एड कॉलेज चंद्रपूर येथे,या पत संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री रविंद्रजी देवाळकर यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली संम्पन्न झाली.
या आमसभेचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री रवींद्रजी शिंदे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे होते. विदर्भात 22 शाखा असलेल्या या पतसंस्थेची आमसभा चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरच्या आदरणीय अध्यक्षा डॉ सौं प्रतिभा जीवतोडे तसेच पोलिसांच्या पत संस्थेचे चंद्रपूरचे सन्माननीय श्री राहुलजी कोंदे तसेच जनता पत संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष डॉ आशिष महातले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी व संचालक मंडळ,प्राविन्य प्राप्त विध्यार्थी -पालक, व मोठ्या संख्येने उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ अशोक जीवतोडे सेक्रेटरी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर उपस्थित होते.