Tuesday, September 22, 2026
spot_img
HomePombhurnaहर्षद गंधेवार यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित

हर्षद गंधेवार यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित

हर्षद गंधेवार यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित

पोंभूर्णा चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्सचे मुख्य लिपिक हर्षद गंधेवार यांना विद्यापीठाच्या अधिसभेत काम करण्याची संधी

*ज्योत्स्ना वानखेडे*: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या अधिसभेवर चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णी येथील मुख्य लिपिक हर्षद गंधेवार यांचे सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार हे नामनिर्देशन करण्यात आले असून, याबाबत गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाकडून ९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत अभिनंदनपत्र देण्यात आले आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेंखन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रात हर्षद गंधेवार यांचे विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिसभेवर नामनिर्देशनाबद्दल गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने गंधेवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यात त्यांच्या मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभावे, अशी सदिच्छाही विद्यापीठाने व्यक्त केली आहे.
हर्षद गंधेवार हे चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभूर्णा ता. पोंभुर्णी, जि. चंद्रपूर येथे मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. पोंभुर्णी येथील महाविद्यालयीन प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या गंधेवार यांना आता गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी
गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर हर्षद गंधेवार यांचे नामनिर्देशन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोंभुर्णा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या माध्यमातून विद्यापीठाशी संबंधित विविध विषयांवर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
हर्षद गंधेवार यांच्या या नामनिर्देशनाबद्दल त् चिंतामणी महाविद्यालयाचे संस्थाचालक , सिनेट सदस्य श्री स्वप्नील दोंतुलवर आणि मित्रपरिवार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, विद्यापीठाच्या कार्यात ते प्रभावी योगदान देतील, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page