Monday, May 18, 2026
HomeNagpur"महाराष्ट्र दिन" दिवशीच्या अनुकंपा आंदोलनाची सकारात्मक दखल !
spot_img

“महाराष्ट्र दिन” दिवशीच्या अनुकंपा आंदोलनाची सकारात्मक दखल !

“महाराष्ट्र दिन” दिवशीच्या अनुकंपा आंदोलनाची सकारात्मक दखल !

ज्योत्स्ना वानखेडे:

       शिक्षण विभागाने, दिनांक २७ जानेवारी २०२६ ला खासगी शाळेत अनुकंपा नियुक्तीस मान्यतेसाठी शासन निर्णय निर्गमित केला, यापूर्वीच्या अनुकंपा नियुक्ती व मान्यतेबाबत संभ्रम निर्माण झालेला होता, अनुकंपा नियुक्त्या पुन्हा नव्याने दाखवून मान्यता घ्याव्यात असाही मत प्रवाह व्यक्त केला जात होता, नागपूर जिल्हात पस्तीस ते चाळीस, चंद्रपूर जिल्हा दहा ते पंधरा भंडारा जिल्हा सहा ते सात वर्धा, गोंदिया व गडचिरोली जिल्हा प्रत्येकी दोन ते तीन प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे.
श्रीमती कल्पना पत्नी मयत शिक्षक दुर्वास ईखारकर, महात्मा गांधी  विद्यालय वानाडोंगरी नागपूर मुलगा धिरज दुर्वास ईखारकर, बी ई सिव्हिल, अनुकंपा लिपिक पदावर मान्यतेसाठी दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्ताव  शिक्षणाधिकारी,माध्यमिक नागपूर यांचेकडे सादर करण्यात आला आहे.अद्यापही अनुकंपा नियुक्तीस मान्यता मिळाली नाही.त्यामुळे दिनांक १ मे २०२६,महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बेमुदत उपोषणाबाबत निर्णय घेतला होता परंतू महाराष्ट्र दिनी उपोषणाला परवानगी न मिळाल्याने धरणे आंदोलन करण्यात आले, निवेदने मा आयुक्त शिक्षण पुणे यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक बर्डी, नागपूर यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे.
      कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक,योजना, यांच्या मते शिक्षणाधिकारी योजना, फक्त शिफारस करणार व मान्यता शि‌क्षणाधिकारी माध्यमिक मान्यता प्रदान करणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला होता,खाजगी शाळा शिक्षक संघाने शिक्षण संचालक योजना व जिल्हा शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता यात आशिष चव्हाण जिल्हा शिक्षणाधिकारी योजना नागपूर यांचा पुढाकार व सहकार्य मोलाचे ठरले आहे.
     शिक्षण संचालनालयाने अनुकंपा नियुक्ती, नियुक्तीस मान्यता या बाबतीत शिक्षणासंचालक योजना, माध्यमिक व प्राथमिक यांची संयुक्त बैठक घेऊन लेखी सुचना शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांना देण्यात येऊन दिनांक २७ जानेवारी २०२६ पुर्वीच्या अनुकंपा नियुक्ती व मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक हे प्रदान करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी शाळा शिक्षक संघाने आशिष चव्हाण जिल्हा शिक्षणाधिकारी योजना नागपूर यांचा पुढाकार व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
[वरिष्ठ पोलिस निरीक्षक बर्डी, नागपूर यांचे मार्फत अनुकंपा निवेदन देतांना, शिक्षक विधवा श्रीमती कल्पना दुर्वास ईखारकर व संघटनेचे पदाधिकारी  ]
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page