Wednesday, September 23, 2026
spot_img
HomeEducation*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात ‘उजास’ अंतर्गत मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन...

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात ‘उजास’ अंतर्गत मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन कार्यशाळा*

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात ‘उजास’ अंतर्गत मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन कार्यशाळा* 

*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत ‘उजास’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीरात होणारे शारीरिक बदल, त्यामागील कारणे तसेच या वयात घ्यावयाची आरोग्यविषयक काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेच्या मार्गदर्शक मा. रितू सोनूताई रवींद्र मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्त्रीच्या शरीरातील गर्भाशयाची रचना व कार्य, मासिक पाळीची प्रक्रिया तसेच मासिक पाळीदरम्यान शरीरात होणारे विविध बदल याविषयी शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन केले. मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, कोणत्या प्रकारचे स्वच्छताविषयक साहित्य वापरावे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर व विल्हेवाट कशी लावावी, याबाबतही माहिती देण्यात आली.
तसेच मासिक पाळीशी संबंधित समाजातील अफवा, गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याची गरज यावर विशेष भर देण्यात आला. कोणत्याही अफवेवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती, स्वच्छता आणि नियमित आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेला  सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी सर्व मार्गदर्शकाचे आभार मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page