Monday, September 28, 2026
spot_img
HomeRajura*राजुरा पोलीस स्टेशन कडून दिवसा घरातील चोरी करणारा विधी संघर्षग्रस्त बालका कडून...

*राजुरा पोलीस स्टेशन कडून दिवसा घरातील चोरी करणारा विधी संघर्षग्रस्त बालका कडून गुन्हा उघड*

*राजुरा पोलीस स्टेशन कडून दिवसा घरातील चोरी करणारा विधी संघर्षग्रस्त बालका कडून गुन्हा उघड*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

पोलीस स्टेशन राजुरा येथे फिर्यादी की नामे ईलाज सुल्तान शेख वय 56 वर्ष रा सास्ती, दि. 25/09/2026 रोजी चे 13/00 वा. ते 14/00 वा दरम्यान घर बंद करून नमाज पठण करीता जामा मस्जिद राजुरा येथे गेलो असता, कोणीतरी अज्ञात चोराने घरातील बेडरूम मधील लोखंडी आलमारी दोन्ही दार उघडा दिसले, तेव्हा फिर्यादीने आपल्या पत्नी ला बोलावुन सोन्याचे दागिन्याची शहानिशा केली असता, तिने लॉकर मध्ये जुने वापरते 01) 02 जोड कानातील सोन्याचे झुमके अ वजन 07 ग्रॅम अ कि 40,000/- रु 02) 01 जोड कानातील सोन्याचे रिंग अ वजन 02 ग्रॅम अ. कि 10,000/- रु 03) 01 नग सोन्याची अंगुठी अंदाजे वजन 03 ग्रॅम कि 10,000/- रु 04) 1 नग सोन्याचे चैन ज्याला 786 असा लॉकेट लागलेला अ. वजन 5 ग्रॅम अ. कि 15,000/- रु 05) 01 जोड कानातील सोन्याचे झुमके अंदाजे वजन 2 ग्रॅम अ. कि 15,000/- रु 06) 01 नग नाकातील सोन्याचे नथनी व बेसर अंदाजे वजन 01 ग्रॅम 5000/- रु असा एकुण 1,00,000/- रु चा सोन्याचे दागिने मुद्देमाल चोरी केली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, मा. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली डि. बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे व सोबत डी.बी पथक यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार कडून मिळालेल्या माहितीवरून खालील नमुद विधी संघर्षग्रस्त बालकास वय १४ वर्ष रा सास्ती ता राजुरा यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली व त्यांच्याकडून गुन्ह्यात दाखल असलेल्या मुद्देमाल खालीलप्रमाणे जप्त केले आहे.

*पोलीस स्टेशन अप क्र 745/2026 कलम 305 भा.न्या.सं*

*सोन्याचे दागिने वर्णन*

*गुन्ह्यातील चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल अ. कि १,००,०००/- रु चा माल हस्तगत करण्यात आला.*

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी सा चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपूर मा. सहायक पोलीस अधीक्षक सा श्री. कुमार सुंशात सा राजुरा  यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलींद जांभुळे, रमेश बस्सी, राजीव दुबे यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page