*सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष मोहीम राबविण्याबाबत ई-केवायसी व प्रलंबित ई-केवायसी विशेष मोहिमेबाबत.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
*संदर्भ :-* १. मा. अप्पर तहसीलदार, चंद्रपूर यांचे पत्र जा. क्र. कक्ष-१/कार्या-१२/कावि-१२८/२०२६, दि. १७ सप्टेंबर २०२६.
२. मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची दि. २१/०९/२०२६ रोजीची V.C. मध्ये दिलेले निर्देश.
संदर्भिय क्र. १ अन्वये शासन निर्देशानुसार, राज्य शासनामार्फत दि. १७/०९/२०२६ ते दि. १७/१०/२०२६ या कालावधीत सेवा संकल्प मोहीम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप करणे, शासन उपाययोजना दि. २८/०९/२०२६ ते दि. ३०/०९/२०२६ या कालावधीत रेशन धान्य वाटप केंद्रावर विशेष (सेवा सेतू केंद्र) राबवून लाभार्थ्यांचे ई-केवायसी व मोबाईल सिडींग करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
तसेच मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दि. २१/०९/२०२५ रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत निधान सुधार अंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची ई-केवायसी, धान्य वाटपाचे प्रमाण वाढविणे, मृत लाभार्थी, दुबार लाभार्थी, व इतर उपाययोजना संदर्भात आपणास आढावा घेण्यात आला. आपण सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचना लक्षात घेता की आपल्याकडे प्रलंबित असलेल्या ई-केवायसी / सिडींगची मोहीम युद्ध पातळीवर राबविणे ही केली आहे. दि. २८/०९/२०२६ ते दि. ३०/०९/२०२६ या कालावधीत रेशन दुकानावर खालील ठिकाणी आपले स्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करून लाभार्थ्यांना शिबिराद्वारे ई-केवायसी व सिडींग करून घेणे बंधनकारक आहे, तसेच वाटप केंद्रावर जाऊन लाभार्थी तपासणी व केवायसी कार्यवाही बाबतची सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे कार्यवाही करावी व अहवाल सादर करावा.
निर्देशाचे काटेकोर पालन करून शिबिराचे आयोजन करावे असे कळविण्यात येते.
बल्लारपूर शहरातील सर्व रेशन कार्डधारकांना सूचित करण्यात येते की आपल्या कुटुंबातील सदस्याचे ई-केवायसी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने सर्व रेशन कार्डधारकाचे आपले ई केवायसी रेशन धान्य दुकानांमध्ये जाऊन पूर्ण करून घ्यावे अन्यथा ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड मध्ये लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येईल त्या अनुषंगाने खालील ठिकाणी सेवा संकल्प अभियाना अंतर्गत विशेष मोहीम शिबिर दिनांक 28, 29, 30 सप्टेंबर 2026 रोजी खालील ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे
1. वैशाली चौक बल्लारपूर
2. साईबाबा वार्ड बल्लारपूर येथे सर्व
3. जय भीम चौक बल्लारपूर
4. झवेरी मार्केटच्या बाजूला कालरी रोड बल्लारपूर येथे सर्व
लाभार्थ्यांनी शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.
आदेशानुसार, तहसीलदार बल्लारपूर यांनी कळविले आहे. त्या अनुषंगाने झवेरी मार्केटच्या बाजूला
प्रदीप मिर्यालवार, हेमंत मानकर, भास्कर माकोडे सुरेंद्र मुरकुटे, चैतन्य डोंगरे, नावेद खान, कुलदीप सुंचुवार हे काम बघत आहे.