*बल्लारपूर येथुन राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता 2026 करिता शौर्य कराटे क्लब बल्लारपुर चे विद्यार्थी रवाना.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि 29/09/2026 ला बल्लारपूर येथुन राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता 2026 करिता शौर्य कराटे क्लब बल्लारपुर चे विद्यार्थी रवाना झाले. दि.01/10/2026 ते 04/10/2026 पर्यन्त होणारी 25 वी आय.एस.के.एफ राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता व ऑल इंडिया शोतो कप 2026 करीता ज्या मध्ये भारताच्या कान्हा कोपऱ्यातुन या प्रतियोगिते मध्ये भाग घेण्या करिता येत आहे. या प्रतियोगिते मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्या करिता इंटरनेशनल शोतोकान कराटे फेडरेशन ऑफ इंडिया व आय एस के एफ महाराष्ट्र आणि शौर्य कराटे क्लब बल्लारपूर कराटे प्रशिक्षक सेन्सेई संजीव कुबडे, से.अजय खोब्रागडे, से.विकास देशभ्रतार, से.संजय पारधी, से.सतीशबाबु अग्रवाल, से.कुणाल कुबडे यांचे द्वारा निवड करण्यात आली.
ज्या मध्ये रुद्रा कोंडागुर्ला, मन फर्डे, मित फर्डे, हार्दिक खोब्रागडे, विष्णु विश्वकर्मा, आरुष चौधरी, साहील खोब्रागडे, प्रेमकुमार लिडबे,परशुराम पेंदोर,वेदांत नागतुरे, प्रणय ताडसे, रोहीत राजभर, शिशिर प्रसाद, विवेक अनासुरे,चैतन्य कुबडे , कु.गार्गि आमटे, कु. चेरिता जुटटु, कु. उन्नती कोंडागुर्ला, कु. दिशा नवसागरे, कु.तमन्ना पठान, कु. वैष्णवी पेंदोर, कु.सिया खोब्रागडे, कु.शौर्या खोब्रागडे, कु. तृषा खोब्रागडे, कु. मानवी ताडसे सोबतच पालक वर्ग श्री.राकेश कोंडागुर्ला,सौ.नंदा कोंडागुर्ला, सौ.वंदना बिलगय्या, श्री.सुमित आमटे, सौ.सोनाली आमटे, श्री.बालाजी चौधरी, सौ.रंजना चौधरी, सौ.सुनिता अग्रवाल, सौ.संगिता खोब्रागडे, सौ.प्रिती पारधी, श्री.प्रेमदास फर्डे.
ह्यांची निवड आय एस के एफ महाराष्ट्र फेडरेशन द्वारा करण्यात आली. दि.01/10/2026 ते 04/10/2026 ला गुरु मंडल आश्रम हरिद्वार (ऋषिकेष) येथे घेण्यात येणार असून या सेमिनार व कराटे प्रतियोगिते मध्ये प्रशिक्षक व खेळाडु प्रशिक्षण घेण्या करिता येत आहे. या प्रशिक्षणाला मुख्य प्रशिक्षक म्हणुन जापान चे सेन्सेई ग्रांड मास्टर माशिरो मातोमुरा 10th डॅन ब्लॅक बेल्ट आय एस के ए प्रशिक्षण देणार आहे.
या सेमिनार चे मुख्य आयोजक आय.एस.के.एफ.इंडिया चे फांउडर सेन्सेई शिव के. पांचाल (यु.ए.ई) व अध्यक्ष सेन्सेई संजीव कुबडे (महाराष्ट्र) ह्यांचे द्वारे घेण्यात येत आहे.