शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..!
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक :२९/०९/२०२६ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष मान. श्री. रवींद्र शिंदे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शेतकरी आणि सभासदांच्या आर्थिक विकासाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी या सभेत अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत.
आपल्या शेतकरी बंधूंना संकटातून बाहेर काढत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेने काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे.
ज्यात ‘एक रकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS): शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हलका करण्यासाठी ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे. आधुनिक ‘कृषी ३६० पिककर्ज वाटप प्रणाली’: कर्ज वितरण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब. शेतमाल तारण कर्ज व ड्रोन फवारणी योजना: आधुनिक शेतीला चालना देणारे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणारे उपक्रम. विशेष स्मृती व कल्याणकारी उपक्रम: सहकार महर्षी कै. ॲड. बाबासाहेब वासाडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘सहकार सप्ताह’ आणि बँकेच्या परिसरात त्यांचा प्रेरणादायी पुतळा बसविण्याचा निर्णय. आरोग्य सुविधा: बँक परिवार व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार.
शेतकरी आणि सभासदांच्या कल्याणासाठी आपली बँक भविष्यातही अशीच कटिबद्ध राहून नवनवीन कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवित राहील, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त केला.
या सभेस बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री. संजय डोंगरे, मानद सचिव मा.श्री. अवेशखान पठाण, संचालक श्री. सुदर्शन भगवानराव निमकर, डॉ. अनिल वाढई, श्री. गजानन पाथोडे, श्री. रोहित बोम्मावार, श्री. उल्हास करपे, श्री. यशवंत दिघोरे, श्री. निशिकांत बोरकर, श्री. जयंत टेभुर्डे, श्री. दामोदर मिसार, श्री. विलास मोगरकार, श्री. ललीत मोटघरे, श्रीमती नंदाताई अल्लुरवार, श्री. गणेश तर्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर भि. कल्याणकर यांच्यासह मोठ्या संख्येने विविध संस्थांचे अध्यक्ष, संचालक, सचिव व सभासद उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकार क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घेईल, हीच खात्री आहे.