*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत होणाऱ्या मस्कऱ्या गणपती उत्सव तसेच दुर्गा व शारदा नवरात्री उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्या करीता पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत राहणारा कुख्यात दारू विक्री करणारा ज्यावर एकुण 06 गुन्हे एकट्याने केल्याने नोंद असलेला कुख्यात दारू विक्रेता नामे मनोज देवराव चांदेकर वय 45 वर्ष रा. परसोडी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर यांचेवर चंद्रपूर जिल्हा पोलीस स्टेशन कोठारी मध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती. सदर इसमावर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा त्याने आपले कृत्य चालुच ठेवले त्याचे गुन्ह्याची नोंद ठाणेदार सपोनी दिपक काँक्रेडवार पो.स्टे. कोठारी यांनी घेवुन कलम 56 (1), (अ)(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये गोपनीय प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्शनात तयार करून उपविभागीय अधिकारी सा. गोंडपिपरी यांना सदर केला. यांनी सदर गुन्ह्याची दखल घेवुन त्यास एक महीन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात तडीपार करण्याचे आदेश काढल्याने सदर इसमास हद्दपार करण्यात आले आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. राजुरा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार कोठारी सपोनी दिपक काँक्रेडवार, पो.उपनि. रविंद्र इंगळे, पो.अ. हिवाराज सातपुते ब.नं. 1325 पो.अं. गणेश देठे ब.नं. 1406, तसेच गुन्हे शाखा चंद्रपूर येथील स. फौ. अरूण खारकर, परवरीश शेख यांनी मोलाची कामगिरी केली.