दिनांक 30/09/2026 रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे फिर्यादी यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक 30/09/2026 रोजी चे 15:15 वाजताचे दरम्यान फिर्यादीची मुलगी ही कॉलेज मधुन घरी आल्यानंतर तिला त्यांचे घराचा वॉलकंपाउंडचा गेट बंद दिसला व घराचा दरवाजा खुला दिसल्याने फिर्यादीच्या मुलीने घरात जावून पाहीले असता तिला एक अनोळखी इसम वय अंदाजे 25 वर्ष तोंडाला दुपट्टा बांधलेला इसम बेडरूमच्या दरवाज्या जवळ दिसला तेव्हा ती ओरडल्याने सदर अनोळखी इसमाने फिर्यादीचे मुलीचा हात पकडुन ओढतान केली व बेडरूम मध्ये तिला ढकलुन दिल्याने ती खाली पडली व तिच्या डाव्या हाताच्या ढोपराला व करंगळी ला मार लागला आहे व बेडरूमचा दरवाज्याचा कोंडा बाहेरून लावून फिर्यादीचे मुलीला बेडरूममध्ये बंद करून ठेवले व सदर अनोळखी इसम हा तिथुन पळून गेला. फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी शेतातुन अंदाजे 15:30 वाजता घरी पोहोचली असता फिर्यादीला त्यांचे घराचा दरवाजा उघडा दिसला व फिर्यादीला बेडरूममधून त्यांचे मुलीचा आवाज आल्याने फिर्यादीने बेडरूमचा दरवाजा खोलून त्यांचे मुलीला बेडरूममधून बाहेर काढले व बेडरूममधील आलमारी चेक केली असता आलमारीतील नगदी 5000/- रु. दिसुन आले नाही. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. वरोरा येथे अप क्र. 1004/2026 कलम 331(3), 309(4) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच मा. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के सा. यांचे आदेशाने वरोरा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने तपासाचे चक्र फिरवून केलेल्या तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे प्रज्वल प्रमोद झिले वय 19 वर्ष धंदा शिक्षण रा. टेमुर्डा ता. वरोरा जि. चंद्रपूर यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करून सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीस दिनांक 01/10/2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. श्री आयुष नोपानी पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, मा. संतोष बाकल पोलीस उपविभागीय अधिकारी सा. वरोरा तसेच मा. पो.नि. ओमप्रकाश सोनटक्के सा. यांचे मार्गदर्शनामध्ये पोउपनि. मनिष तालेवार, पो.हवा. संदीप मुळे, प्रशांत नागोसे, पो.अं. विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सौरभ कुलथे, सुखराज यादव, महेश गावतुरे यांनी केली.