*चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड, धोकादायक व्यक्ती देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर यांस एम.पी.डी.ए.कायदा अंतर्गत पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचा दणका.*
*चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड, धोकादायक व्यक्ती देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर यांस एम.पी.डी.ए.कायदा अंतर्गत पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचा दणका.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सक्रिय झाले असून मा. श्री. आयुष नोपानी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) व मा. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आगामी सणासुदीच्या काळात जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी कुख्यात गुंड व धोकादायक व्यक्ती देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर रा. मित्र चौक गांधी वार्ड वरोरा जि. चंद्रपूर यांचेवर पो. स्टे. वरोरा येथे खुन, अवैध दारू, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत एकूण 18 गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे. त्याने सामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली असुन त्याने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायद्याला जुमानत नसल्याने याची दखल मा. पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर यांनी घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पारेट्स) वाळु तस्कर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन 1981 (सुधारणा 2009, 2015) अन्वये प्रस्ताव तयार करून मा. श्रीमती वसुमना पंत, भा.प्र.से., जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम नामे देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर रा. मित्र चौक गांधी वार्ड वरोरा जि. चंद्रपूर यास नमुद कायद्यांतर्गत 01 वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत दिनांक 24/09/2026 रोजी आदेश पारीत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, संतोष बाकल, श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच ठाणेदार पो. स्टे. वरोरा, श्री. ओमप्रकाश सोनटक्के व श्री. योगेश खरसान सपोनि यांनी मोलाची कारवाई केली आहे.