Sunday, October 4, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूरच्या आरोग्य प्रश्नांना मंत्रालयात वाचा; आ. किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी...

चंद्रपूरच्या आरोग्य प्रश्नांना मंत्रालयात वाचा; आ. किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी भेट

चंद्रपूरच्या आरोग्य प्रश्नांना मंत्रालयात वाचा; आ. किशोर  जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी भेट

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूर मतदारसंघातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याशी तसेच वैद्यकीय शिक्षणाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांची निवेदनेही यावेळी सादर करण्यात आली असून, या विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

           चंद्रपूर मतदारसंघात आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असून, नागरिकांना दर्जेदार आणि सहज उपलब्ध वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने विविध स्तरांवर पाठपुरावा करीत आहेत. याच अनुषंगाने मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

  या भेटीत वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित विविध बाबींसोबतच आरोग्य क्षेत्रातील नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. चंद्रपूरच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुविधा, वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित गरजा आणि नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत आमदार जोरगेवार यांनी आरोग्य मंत्री यांचे लक्ष वेधले.

   आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडलेल्या विविध विषयांची मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मकतेने दखल घेतली. संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती घेऊन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल तसेच ते निकाली काढण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

           चंद्रपूरच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आमदार जोरगेवार यांनी थेट राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्याने या प्रश्नांना आता शासनस्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page