Tuesday, October 6, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*जिल्हा शल्य अधीक्षक पदी डॉ.भास्कर सोनारकर यांची नियुक्ती*

*जिल्हा शल्य अधीक्षक पदी डॉ.भास्कर सोनारकर यांची नियुक्ती*

*जिल्हा शल्य अधीक्षक पदी डॉ.भास्कर सोनारकर यांची नियुक्ती*

*ज्योत्स्ना वानखेडे*: आपली कर्म आणि जन्मभूमी असलेल्या बल्लारपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि विषभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार घालून त्यांच्या महान विचारांना अभिवादन करून आपल्या कार्याची सुरुवात करतांना आपल्याला अपार आनंद होत असल्याचे मत नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकर यांनी व्यक्त केले. ते बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन मेश्राम आणि बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोजित एका छोटेखानी शुभेछा कार्यक्रमात शुभेच्छुकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.दरम्यान बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील चमू नी डॉ.भास्कर सोनारकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
११ एप्रिल १९८० रोजी जन्मलेल्या डॉ. भास्कर रमेश सोनारकर यांनी अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील टेका मांडवा या गावातून डॉ.म्हणून आरोग्य सेवेची सुरवात केली.या दरम्यान त्यांनी मूल,बल्लारपूर,चंद्रपूर या शहरातही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सांभाळले.दरम्यान त्यांना दोनवेळा बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात सेवेची संधी मिळाली.अत्यंत कमी वयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*रुग्णांची हयगय सहन केली जाणार नाही:*
खरेतर आरोग्य विभागात डॉक्टर,नर्सेस प्रामाणिक काम करतात.बरेच अधिकारी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कर्तव्य बजावतात.असे असतांनाही काही अपवादात्मक अधिकारी कर्मचारी कामचुकारपणा करतात.रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांपर्यंत सुरडीत आरोग्यसेवा पोहचविणे हाच उद्देश!*
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा आणखी पारदर्शी आणि सुरडीत करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असून जिल्यातील,प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कोणत्या बाबीची कमतरता असेल तर शासकीय स्तरावर विनंती करून ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाला भेट देण्याचा प्रयत्न*
जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाला शासकीय आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी जिल्यातील शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन तिथल्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आवश्यक मनुष्यबळ नसल्याने अनेक समस्या उद्भवतात.त्यांचा समन्वय साधून आवश्यक तेथे योग्य नियोजन करणार असून,जिल्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page