Tuesday, October 6, 2026
spot_img
HomeJayantiमहाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी— भाजप महानगरतर्फे...

महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी— भाजप महानगरतर्फे अभिवादन

महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी— भाजप महानगरतर्फे अभिवादन

*Jyotsna Wankhede* : गोंडवाना साम्राज्याच्या शूर, पराक्रमी आणि स्वाभिमानी वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाराणी दुर्गावती या भारतीय इतिहासातील शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि त्यागाचे तेजस्वी प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मातृभूमीच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. संकटाच्या काळात न डगमगता शत्रूशी धैर्याने मुकाबला करत आपल्या राज्याचे आणि प्रजेचे संरक्षण केले. अन्याय व आक्रमणापुढे शरण न जाता स्वाभिमानाने संघर्ष करण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला.
महाराणी दुर्गावती यांचे जीवन हे केवळ इतिहासातील एक पर्व नसून महिला शक्ती, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि आत्मसन्मानाची प्रेरणादायी गाथा आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दाखवलेले धैर्य आणि मातृभूमीसाठी केलेले सर्वोच्च बलिदान आजच्या पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. त्यांच्या शौर्यगाथेचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी महाराणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्याला व त्यागाला अभिवादन करण्यात आले. “महाराणी दुर्गावती यांचा स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील,” असा भावना यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्य कार्यकारी परिषद सदस्य तुषार सोम, महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, उपाध्यक्ष बलराम डोडाणी, कामगार झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष रामकुमार आकापेल्लीवार, मुस्लिम महिला अध्यक्षा कौसर खान यांच्यासह वंदना हजारे, रेश्मा पांडे, रीना साखरकर, सोनाली इटणकर, शालू कन्नोजवार, अंजु तोरे, वंदना कडुकर, मीनाक्षी उपगंलावार, उषा कापटे, रेणुका येरणे तसेच भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महाराणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श आपल्या आचरणात आणण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page