Thursday, October 8, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*बल्लारपूर शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिक संकुलांनमधे करा महिला, पुरुष स्वच्छतागृहांची व्यवस्था*

*बल्लारपूर शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिक संकुलांनमधे करा महिला, पुरुष स्वच्छतागृहांची व्यवस्था*

*बल्लारपूर शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिक संकुलांनमधे करा महिला, पुरुष स्वच्छतागृहांची व्यवस्था*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक: 07/10/2026 ला नगर परिषद बल्लारपूर ला निवेदन देऊन केली मागणी “बल्लारपूर शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिक संकुलांनमधे करा महिला, पुरुष स्वच्छतागृहांची व्यवस्था” या प्रकारची मागणी करण्यात आली.
बल्लारपूरच्या मुख्य व्यापारी संकुलानमध्ये स्वच्छतागृहांची एक तर दुर्दशा आहे किंवा तिथे स्वच्छतागृहच नाहीत त्यामुळे शहरातील नागरिकांना व त्या व्यापारी प्रतिष्ठान मध्ये जाणाऱ्या ग्राहकांना व तिथल्या व्यापारांना सुद्धा देखील स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो.
एखाद्या संकुलामध्ये स्वच्छता गृह असले तरी अत्यंत घानवस्थेत असल्याने त्याचा वापर देखील जिकरीचा ठरतो अशाच परिस्थितीमध्ये महिलांना तर खूपच असहज परिस्थितीचा सामना करावा लागतो या सर्व समस्यांचा समाचार घेत बल्लारपूर शहरातील मुख्य तीन व्यापारी संकुलांचे बालाजी कॉम्प्लेक्स, व्यंकटेश एम्पायर, अर्जुना कॉम्प्लेक्स, तसेच नगर प्रशासनाकडे माहिती असलेल्या इतर व्यापारी संकुलांमध्ये येत्या पंधरा दिवसात स्वच्छतागृहाचे व्यवस्था करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांच्या नेतृत्वात व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
याप्रसंगी शहर महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, पराग जांभुळकर, प्रकाश रामटेके, आय. टी.प्रमुख प्रियंकेश शिंगाडे, युवा ता.अध्यक्ष अभिलाष चूनारकर, मनोज रघुवंशी,  सुरज शृंगारे, आशाताई भाले, अनिता शंभरकर, संगीता मजगवळी, अनुकला वाघमारे,  सुनील साठे, संदीप ताकसांडे, राकेश निमसटकर, राहुल डांगे, सुमित भाले, संघमित्रा दुर्योधन, श्रावस्ती खोब्रागडे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page