Thursday, October 8, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*मॅजिक बसच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा; बल्लारपूरमध्ये उद्योजकता जागरूकता कार्यक्रम संपन्न*

*मॅजिक बसच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा; बल्लारपूरमध्ये उद्योजकता जागरूकता कार्यक्रम संपन्न*

*मॅजिक बसच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा; बल्लारपूरमध्ये उद्योजकता जागरूकता कार्यक्रम संपन्न*

*मॅजिक बसच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योजकता जागरूकता कार्यक्रम*

*ज्योत्स्ना वानखेडे*: दि. 07 ऑक्टोबर 2026 रोजी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून संचालित आजीविका संसाधन केंद्र (LRC), बल्लारपूर येथे बामणी, अमितनगर आणि बल्लारपूर परिसरातील 35 महिलांच्या सहभागाने उद्योजकता जागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.
महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्यामध्ये व्यवसायाच्या संधीबाबत विचार करण्याची क्षमता विकसित करणे तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात आइस-ब्रेकिंग ॲक्टिव्हिटी, जोडीने परिचय आणि संवादात्मक प्रश्नमंजुषा यांद्वारे करण्यात आली. यावेळी महिलांच्या स्वप्नांवर, कौशल्यांवर आणि समुदायातील उपलब्ध संधींवर संवादात्मक चर्चा घेण्यात आली. महिलांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महिलांनी व्यवसाय करणे का महत्त्वाचे आहे, तसेच उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाच्या उत्पन्नात कशाप्रकारे योगदान देता येते, याबाबत केंद्र व्यवस्थापक अमिर तुराळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रकल्पाची माहिती, मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच Tata Trusts याबाबत माहिती देण्यात आली. महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे आलेल्या महिलांच्या यशोगाथांचे व्हिडिओ दाखविण्यात आले.
तसेच “व्यवसायाच्या कल्पना कशा निर्माण कराव्यात?” या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. महिलांचे विविध गट तयार करून स्थानिक उपलब्ध संसाधने, समुदायाच्या गरजा आणि परिसरातील संभाव्य व्यवसायाच्या संधी यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमुळे महिलांना आपल्या परिसरातील संधी ओळखून व्यवसायाच्या नवीन कल्पना विकसित करण्यास प्रोत्साहन मिळाले.
यावेळी आगामी पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणातील महत्त्वाचे विषय, प्रशिक्षणाची उपयुक्तता आणि नियमित उपस्थितीचे महत्त्व महिलांना समजावून सांगण्यात आले. महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण अधिकारी वैभव करमरकर व राणी खिरटकर, फायनान्स विभागातील वरिष्ठ अधिकारी नितीन उपगन्त्लावार तसेच उद्यम सखी रुपाली सातपुते आणि रेश्मा कुसराम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आगामी पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि व्यवसाय नियोजनाबाबत मार्गदर्शन मिळून त्या स्वतःच्या व्यवसायाच्या दिशेने सक्षमपणे पुढे जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page