*राजुरा पोलिस स्टेशन कडून आंतरराज्यीय चोरट्यांचे टोळीचा पर्दाफाश*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन राजुरा येथे फिर्यादी नामे राकेशकुमार देवीलाल रांगडाले वय ४७ वर्ष, व्यव., रा. रिंग रोड नं. २ श्रेया कॉम्प्लेक्स जवळ ताटीबंद रायपुर ता जि रायपूर राज्य छत्तीसगढ, यांनी फिर्याद दिली कि दिनांक ०८/१०/२०२६ रोजी आमचे एसव्हीए ट्रान्सपोर्टींग कंपनीचे दोन गाडी ट्रक क्र. सी जी २२ ए.के ७९८२ आणि ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० या दोन ट्रक गाडीमध्ये कोलफाईस हा माल रायपूर येथून भाटीया कोल वॉशरी पांढरपौनी ता राजुरा जि चंद्रपूर येथे आलेल्या होत्या.
तेथे माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक हे लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग येथे माल भरण्यासाठी निघाल्या होत्या. ट्रक क्र. सी जी २२ एके ७९८२ हीचा चालक पुस्पेंद्र कुसवाह वय २४ वर्ष, आणि ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० याचे चालक दिपक कुसवाह यांचे फोन दिनांक ०९/१०/२०२६ रात्री ११/०० वाजता बंद झाले होते. त्यानंतर लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग येथून मला इमरान पठाण सिक्युरिटी सुपरवायजर यांनी यावरून फोनकरून मला सांगीतले की, आपल्या ट्रक गाडी अद्यापपर्यंत माल भरण्यासाठी आलेल्या नाहीत. त्यामुळे मी दोन्ही ट्रकचे जीपीएस लोकेशन पाहीले असता, ते रेल्वे सायटींग ठिकाणचे होते. त्यावेळी मी त्यांना आमचेकडील तुमचे ऑफिसचे बाजूला लावून असलेले आहेत असे सांगीतले. त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी जाउन पाहीले असता, त्यांनी मला सांगीतले की, आपले दोन्ही ट्रक येथे आहेत परंतु त्या दोन्ही ट्रकचे एकुण १७ टायर डिस्कसहीत काढलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ट्रक माल भरणे योग्य नाहीत. सदर माहीती मी माझे मालक श्री विनीतकुमार जैन यांना देवुन त्यांचेसह दिनांक १०/१०/२०२६ रोजी, लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग याठिकाणी येवुन आमचे दोन्ही ट्रक गाडी यांची पाहणी केली असता, दोन गाडी ट्रक क्र. सी जी २२ एके ७९८२ हीचे डिस्क सहीत ९ टायर तसेच ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० हीचे ८ टायर असे एकुण १७ टायर त्यांची एकुण किंमत रु २,५०,०००/-रूपये हे चोरी केले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो स्टे ७७९/२०२६ कलम ३०३ (२) ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतात.पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली डि .बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे पोउपनि सुनिल धांडे व सोबत डी.बी पथक यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार सायबर सेल तांत्रीक बाबी कडून मिळालेल्या माहितीवरून खालील नमुद आरोपीतांना चकौडीया जिल्हा शहडोल राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यात दाखल असलेल्या ट्रकचे टायर खालीलप्रमाणे जप्त केले आहे.
*पोलीस स्टेशन अप क्र 779/2026 कलम 303(2) 3(5) भा.न्या.सं*
*आरोपीचे नाव:- 1) रामलाल गिरधारी यादव वय 27 वर्ष व्यव-मजुरी रा. चकौडिया जि शहडोल मध्यप्रदेश*
*जप्त १७ ट्रक टायर व गुन्ह्यात वापरलेली गाडीचे वर्णन*
*दोन ट्रक चे १७ टायर अ कि २,५०,०००/- रु व गुन्ह्यातील वापरलेली बोलोर पिकअप क्र MP १८ GA५८६७ अ कि ७, ५०,०००/- रु चा असा एकुण १०,००,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्या आला आहे.*
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी सा चंद्रपूर ,मा.अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपूर मा. .सहाय्यक पोलीस अधिक्षक सा श्री.कुमार सुंशात सा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली, सायबर सेल चे सपोनि झाडोकर, पथक व पो.स्टे राजुरा गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे ,पोउपनि सुनिल धांडे ,सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ, शफीक शेख,मिलींद जांभुळे, रमेश बस्सी ,आकाश पिपरे, राजीब दुबे यांनी केली आहे.