Friday, October 23, 2026
spot_img
HomeSpardha*कर्मवीर विद्यालय येनबोडी च्या खेळाडूंची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी पात्र*

*कर्मवीर विद्यालय येनबोडी च्या खेळाडूंची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी पात्र*

*कर्मवीर विद्यालय येनबोडी च्या खेळाडूंची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी पात्र* 

*Jyotsna Wankhede*: 
क्रीडा व युवक संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या U/19 जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कर्मवीर विद्यालय येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धेत *पियुष नैताम* याने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक तर लांब उडी व भाला फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून तिहेरी यश मिळवले. *प्रतीक्षा नेवारे* हिने ट्रिपल जंप मध्ये प्रथम व २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. *लक्ष्मी मडावी* हिने ४०० मीटर धावण्यात द्वितीय, *जागृती ठेंगणे* हिने हॅमर थ्रो मध्ये द्वितीय व *सलोनी मांगम* हिने ८०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच ४x१०० मीटर रिले स्पर्धेत *प्रतीक्षा नेवारे, सलोनी मंगाम, राणू पेंदराम, लक्ष्मी मडावी व सलोनी मोरे* या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला आहे. तसेच 17 वर्षे वयोगटात विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री नागरे सर व श्री वासाडे सर यांचे मुख्याध्यापिका सौ. सुधा वासाडे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. पडोळे मॅडम, पर्यवेक्षक श्री घुगल  सर,व शिक्षक वृंद  यांनी हार्दिक अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page