Thursday, October 22, 2026
spot_img
HomePoliceहत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या इसमास अटक

हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या इसमास अटक

हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या इसमास  अटक 

*Jyotsna Wankhede*:
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची गळा दाबून हत्या करून तिचा मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन दफन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटनेचा संक्षिप्त तपशील:
दिनांक १७/१०/२०२६ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे एका ४९ वर्षीय इसम नामे संतोष साखरकर राहणार तुकूम चंद्रपूर हा स्वतः हजर होऊन माहिती दिली की, त्याचे एका ४५ वर्षीय महिलेसोबत मागील ३-४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४/१०/२०२६ रोजी झालेल्या वादातून संतप्त होऊन या इसमाने सदर महिलेचा गळा दाबून तिला जिवाणिशी ठार मारले.
त्यानंतर, हत्येचा गुन्हा लपवण्याच्या व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह  हिंगणा (जि. नागपूर) येथे नेला आणि दफन करून टाकला.
पोलीस कारवाई:
प्राप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर पोलीस पथकाने तात्काळ हिंगणा (जि. नागपूर) येथील घटनास्थळी भेट देऊन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा केला. उत्खनन करून संबंधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, ओळख पटवल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) व २३८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे
सदरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, पोलीस हवालदार राकेश फुकट, पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे,  रोशन भोईंकर,  लीना काठवले यांनी केलेली असून, गुन्ह्याचा  उकल करण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page