Thursday, October 22, 2026
spot_img
HomeNagpurदीक्षाभूमी परिसरातील सोई-सुविधांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा सुविधांचे काम जवळजवळ पुर्ण; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष...

दीक्षाभूमी परिसरातील सोई-सुविधांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा सुविधांचे काम जवळजवळ पुर्ण; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करण्याचे निर्देश

दीक्षाभूमी परिसरातील सोई-सुविधांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा सुविधांचे काम जवळजवळ पुर्ण; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करण्याचे निर्देश

नागपूर(जीमाका): धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी उभारण्यात येत असलेल्या सोई-सुविधांच्या तयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला. अनुयायांची उपस्थिती वाढायला लागल्यामुळे निर्धारीत सर्व बाबी वेळेत पुर्ण करा. नोडल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व बाबी वेळेत पुर्ण होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नियोजन भवन येथे आयोजित बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह व्यवस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी पहिल्यांदाच लांबून दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. एकून 24 ठिकाणी साकारण्यात आलेली ही व्यवस्था पुर्ण झाली असून तेथे अनुयानांना अंथरून, पांघरुन व आवश्यक बेडींग सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, तक्रार निवारण प्रणालीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. निवासाच्या ठिकाणी अनुयायांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही, यासाठी संबंधित विभागाने काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

दीक्षाभूमी परिसरात दोन दिवस मोठ्या संख्येने गर्दी राहणार आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, अनुयायांच्या सोईसाठी नियंत्रण कक्ष, आरोग्य कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा अंतीम टप्प्यात असून आजपासूनच या सर्व बाबी कार्यान्वित झाल्या पाहिजे. अनुयायांना परिसरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुर्ण वेळ पाणी उपलब्ध राहिले पाहिजे. स्वच्छतागृहे निर्धारीत ठिकाणी ठेवण्यासोबतच त्यांची निर्धारीत वेळेत नियमित देखभाल, त्यासाठी आवश्यक पाणी उपलब्धता, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केल्या.

*सुव्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची*

दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक नेमले जाणार आहे. या स्वयंसेवकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक संवाद साधला. धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात आणि चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. स्वयंसेवकांनी प्रत्येकाशी चांगला संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, त्यांना आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

*निवास व्यवस्थेला 15 कोटींचे  विमा कवच*

यावर्षी उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेत हजारो अनुयायांची सोय होणार आहे. याठिकाणी वास्तव्यास असलेल्या अनुयायांना विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवारा कक्षात अनुचित घटना घडल्यास 10 कोटी तर आगीसारखी घटना घडल्यास त्यासाठी 5 कोटी असा 15 कोटी  रुपयांचा विमा प्रशासनाच्यावतीने काढण्यात आला आहे.

*बालकांच्या हातावर मोबाईल क्रमांकाचे बेल्ट*

दोन दिवस दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. गर्दीमुळे पालकांसोबत आलेली बालके हरविण्याची शक्यता असते. असे झाल्यास बालके लगेच सापडावे यासाठी येथे येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या हातावर बेल्ट लावल्या जाणार आहे. बेल्टवर पालकांचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक राहतील. दीक्षाभूमीकडे प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मार्गावर समाजकल्याणच्या वसतीगृहातील विद्यार्थी प्रवेशावेळीच बालकांचा हातावर हा बेल्ट बांधतील. जवळजवळ 25 हजार बेल्ट यासाठी मागविण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page