Thursday, October 22, 2026
spot_img
HomeCrime*अवैध अंमली पदार्थ तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचा मोठा दणका*

*अवैध अंमली पदार्थ तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचा मोठा दणका*

*अवैध अंमली पदार्थ तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचा मोठा दणका*

*बल्लारपुरात 2.72 लाख रुपयांच्या गांजासह आरोपी जेरबंद*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाकडून सातत्याने धडक कारवाई सुरू आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने बामणी-बल्लारपूर मार्गावरील वेलकम बल्लारशा गेटजवळील परिसरात अत्यंत कौशल्याने सापळा रचून एका अंमली पदार्थ तस्कराला रंगेहात अटक केली. या कारवाईत पाच किलोग्रॅमपेक्षा जास्त गांजा, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 2,72,180/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभाग चंद्रपूर पथक चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या कामात कार्यरत असतांना, गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. राजुरा येथून बामणी मार्गाने एक इसम मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ (गांजा) विक्रीच्या उद्देशाने चंद्रपूरच्या दिशेने घेऊन येत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ सूत्रे हलवली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर वेलकमगेट जवळ वेगाने नाकाबंदी करत रणनीतिक सापळा रचला. ठरलेल्या वर्णनानुसार एक संशयित इसम पाठीवर ग्रे रंगाची बॅग घेऊन बल्लारपूरच्या दिशेने चालत येताना दिसताच, पथकाने त्याला चारी बाजूने घेराव घालून ताब्यात घेतले.

*आरोपीचे नाव : नाव राज तोताराम कोरडे, मूळ रा. अडपल्ली चेक, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली सध्या रा. इंदिरानगर, चंद्रपूर*

एन.डी.पी.एस. कायद्याच्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत, शासकिय पंच, राजपत्रित अधिकारी आणि अधिकृत वजन-मापकाच्या समक्ष आरोपीची आणि त्याच्या बॅगची झडाझडती घेण्यात आली. बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये तपकिरी रंगाच्या पॅकिंग टेपने पूर्णपणे गुंडाळलेले एक पार्सल आढळले. सदर पार्सल पंचासमक्ष उघडला असता पॅकिंग केलेला पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

*जप्त मुद्देमालाचा तपशील*

गांजा ( सुका अंमली पदार्थ ) ५.०३३ किलोग्रॅम, मोबाईल फोन व रोख रकमेसह – २,७२,१८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

*ओडिशा कनेक्शन व गुन्ह्याची नोंद*

प्राथमिक तपासात आरोपीने हा गांजा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ओडिशा राज्यातून अवैध मार्गाने आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून, या आंतरराज्यात पसरलेल्या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

सदर यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, तसेच पोलीस अंमलदार सतीश अवथरे, लालू यादव, इम्रान खान, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, आणि शशांक बदामवार (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), सायबर पोलीस स्टेशन येथील पोहवा कार्तीक खनके, मपोअं. अंजनी घिवे यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page