*दिव्यांगाची मोपेड चोरणारा चोरटा चोरीच्या मोटारसायकलसह रामनगर पोलिसांच्या जाळ्यात.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. १८/१०/२०२६ रोजी दुपारी २ ते ६ वाजेच्या दरम्यान *तक्रारदार बाळू तुकाराम पवार, वय ४९, रा. बालाजी वार्ड क्र. ०२, चंद्रपूर* हे दिव्यांग असून त्यांची वापराकरिता बनवलेली विशेष गाडी चोरीला गेली होती.
त्यांची *होंडा ॲक्टीवा मोपेड क्र. MH-34 CB 6980* – ही दिव्यांग असल्याने मागील चाकाच्या बाजूला दोन चाके लावून बनवलेली होती. ती त्यांनी सवारी बंगला चौक, नगीनाबाग येथील दुकानासमोर लावली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली. याबाबत रामनगर पोलीस स्टेशन येथे *अपराध क्र. १२०५/२०२६, कलम ३०३(२) BNS* नुसार गुन्हा दाखल केला होता.
रामनगर पोलिसांच्या शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सदरची मोटारसायकल *किशोर बाजीराव महाडोरे, वय ४२ वर्षे, रा. मेंडकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर* याने चोरी केली आहे.
तो पोलिसांना वारंवार चकवा देत होता. पोलिसांनी सतत त्याचा मागोवा घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून चोरीला गेलेली *रु. ४०,०००/- किमतीची मोटारसायकल जप्त* करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी ही कारवाई केली आहे.