चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील पदभरतीतील आर्थीक गैरव्यवहाराची एसआयटीच्या माध्यमातुन चौकशी करणार
आ. मुनगंटीवार यांच्या लक्षवेधी सुचनेला गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन.
Shreyash Wankhede:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या लिपीक व शिपाई पदासाठी झालेल्या नोकर भरतीत मोठया प्रमाणावर आर्थीक गैरव्यवहार झाला आहे. हा बेरोजगारांच्या भविष्याशी खेळ असून या आर्थीक गैरव्यवहाराची एसआयटीच्या माध्यमातुन चौकशी करावी आणि ही वादग्रस्त पदभरती रद्द करावी अशी मागणी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत २५ मार्च रोजी लक्षवेधी सुचनेवर सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या प्रकरणाचा संपूर्ण तपशिल त्यांनी सभागृहासमोर मांडला. आरक्षण डावलून झालेली ही पदभरती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. या पदभरतीतील आर्थीक गैरव्यवहाराची चौकशी एसआयटी नेमून त्या माध्यमातुन करण्यात येईल तसेच चौकशीची कार्यकक्षा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून निश्चीत केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.








