Monday, May 18, 2026
HomePoliceबल्लारपूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी
spot_img

बल्लारपूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

बल्लारपूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

श्रेयश वानखेडे:

पोलीस ठाणे बल्लारपूर येथे दिनांक: 21/04/ 2025 रोजी पोलीस स्टाफ पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, मूखबिरद्वारे माहिती मिळाली की, गौरव सुनिल कुकुडकर वय 19 वर्ष राह. किल्ला वार्ड, बल्लारपूर हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले जवळ धारदार तलवार बाळगून रेल्वे चौक बल्लारपूर येथे फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर खबरेची शहनिशा करणे कामी दोन पंचांना घेऊन पोलीस स्टाफसह किल्ला वार्ड  बल्लारपूर येथे गेलो असता मूकबिरने सांगितलेल्या वर्णनाचा इसम हातात तलवार घेऊन उभा दिसला. त्यास पकडून पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून तलवार जप्त करण्यात आली व आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वये कायदेशीर कारवाही करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही मान. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मान. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहाय्यक फौजदार आनंद परचाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पोलीस अमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, लखन चव्हान,  भास्कर चिंचवलकर, शेखर माथनकर, म. पो. अमलदार अनिता नायडू इत्यादी पोलीस  स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने कारवाही केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page