Saturday, August 1, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिपाई वाल्मीक खोंडे यांचा सेवानिवृत्ती...

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिपाई वाल्मीक खोंडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न*

*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिपाई वाल्मीक खोंडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर या शाळेत शिपाई वाल्मीक खोंडे यांना दिनांक 31/07/2026 रोजी सेवानिवृत्ती कार्यक्रम घेऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. एम. बोबडे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे गणेश चंदावार बाबू, सत्कारमूर्ती वाल्मीक खोंडे, पत्नी प्रतिभा खोंडे व मुलगा शुभम खोंडे यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या भाषणात एस. एन. लोदे मॅडम, जगदीश कांबळे आदींनी वाल्मीक खोंडे यांच्या कार्यकाळाबद्दल व कामाबद्दल माहिती दिली.
शाळेच्या वतीने वाल्मीक खोंडे यांचा, पत्नी प्रतिभा खोंडे व मुलगा शुभम खोंडे सोबत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वाल्मीक खोंडे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण एस. एम. बोबडे मुख्याध्यापक यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आर. बी. अलाम, आभार एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात यु. के. रांगणकर सर, इंद्रभान अडबाले, रजिता बदनलवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page