Friday, June 5, 2026
HomePoliceवेल्डिंग वर्कशॉप मध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांचे बल्लारपूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
spot_img

वेल्डिंग वर्कशॉप मध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांचे बल्लारपूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

वेल्डिंग वर्कशॉप मध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांचे बल्लारपूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या 

श्रेयश वानखेडे: बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येनबोडी येथे वेल्डिंग वर्कशॉप चे ताला तोडून चोरांनी १५ हजार ८०० रुपयाचे मुद्देमाल लंपास केले होते. त्यावरून बल्लारपूर पोलीसांनी तपास करीत आरोपी कुणाल रामप्रकाश वर्मा, वय २३ वर्ष, रा. सुभाष वार्ड, बल्लारपुर ह.मु. बल्लारपुर पब्लीक स्कुल येनबोडी ता. बल्लारपूर व करण उर्फ शंकर अशोक दुपारे वय २२ वर्ष रा. ऐनबोडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केले.
      फिर्यादी विनयकुमार मिथलेश विश्वकर्मा रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपुर यांचे येनबोडी येथे वेल्डिंग वर्कशॉप चे दुकान आहे. २ जुलै रोजीचे सायंकाळ ६ वाजता ते ३ जुलै चे सकाळी ९ वाजताच्या चे दरम्यान चोरांनी ताला तोडुन वर्कशॉपमधील एक  अॅम्पीलफायर किं. १० हजार रुपये, एक साउन्ड बॉक्स किं अं. ७००/-रू, लोहा कापण्याचे ब्लेड एक बॉक्स किं.अं. ६००/- रू., एक पाना पेंचीस सेट किं.अं. १५००/- रू ,लोखंडी अँगल, पट्टी, रॉड किं.अं. ३०००/- असा एकुण १५,८००/- रू चा माल चोरून नेला होता.  असे फिर्याद वरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता आरोपी  कुणाल रामप्रकाश वर्मा, वय २३ वर्ष, रा. सुभाष वार्ड, बल्लारपुर हा.मु. बल्लारपुर पब्लीक स्कुल येनबोडी ता. बल्लारपूर, करण उर्फ शंकर अशोक दुपारे वय २२ वर्ष रा. ऐनबोडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या कडून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
     सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरिक्षक बिपीन इंगळे यांचा नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, म.पो. अंमलदार अनिता नायडू यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page