Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeParbhaniनगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.

नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.

नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.

पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही.

Jyotsna Wankhede:नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालीं ना वेग आला असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्या च्या प्रक्रियेला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळालेला नाही. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत सुरू होऊन दोन दिवस उलटून गेले तरी एकही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही.निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी (दिनांक 11 नोव्हेंबर 2025) आणि दुसऱ्या दिवशी (दिनांक 12 नोव्हेंबर 2025) उमेदवारी अर्जांची संख्या 0 (शून्य) इतकीच नोंदविण्यात आली. त्यामुळे प्रशासनिक स्तरावर अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष उमेदवारांनी अद्याप अर्ज न भरणे ही चर्चेची बाब ठरत आहे.स्थानिक राजकीय वातावरणात अद्यापही गाठीभेटी, उमेदवारीबाबतची चर्चासत्रे आणि पक्षीय रणनीतीआखण्याचे सत्र सुरू असल्याचे दिसते. बहुतांश पक्षांत अधिकृत उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू असून, पक्षांतर्गत चर्चे नंतरच उमेदवार अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अर्ज दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध आहे. उमेदवार शेवटच्या काही दिवसांत अर्ज सादर करण्याची प्रथा असते, त्यामुळे पुढील काही दिवसांत अर्जांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.”दरम्यान, मतदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांकडे लागले आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने राजकीय हालचालींना मग बरोबर आहे आणखी वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page