Friday, May 1, 2026
HomeParbhaniसेलू पालिका प्रशासनाचा 'ढिम्म' कारभार; ११ व्या दिवशी उपोषणकर्त्याचे 'मुंडन' करून...
spot_img

सेलू पालिका प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार; ११ व्या दिवशी उपोषणकर्त्याचे ‘मुंडन’ करून निषेध!

सेलू पालिका प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार; ११ व्या दिवशी उपोषणकर्त्याचे  ‘मुंडन’ करून निषेध!

Jyotsna Wankhede: सेलू नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कथित गैरकारभाराची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची ११ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने, आज संतापलेल्या उपोषणकर्त्या ने चक्क ‘मुंडन’ करून प्रशासना चा तीव्र निषेध केला.प्रशासना च्या या उदासीनतेमुळे नागरिकां मध्ये संतापाची लाट उसळली आहे.‘सुजान नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मूलन समिती’चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास राधाकिशन उघडे हे गेल्या २९ डिसेंबर २०२५ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभारी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी शहरातील नगर परिषदेच्या मोकळ्या जागांचे नियमबाह्य वाटप करणे, खासगी व्यक्तींच्या मदतीने रेकॉर्डमध्ये फेरफार करणे आणि डिजिटल बोर्डच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत.प्रशासनाचा ढिम्म कारभार उपोषणाचा ११ वा दिवस असूनही, वरिष्ठ पातळीवरून किंवा स्थानिक प्रशासनाकडून साधी दखलही घेण्यात आलेली नाही. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चालली असतानाही प्रशासन संवेदनशून्य असल्याचे दिसून येत आहे. या मग्रुर कारभाराचा निषेध म्हणून उघडे यांनी आज सार्वजनिकरीत्या मुंडन केले.मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुख्याधिकारी तुकाराम कदम आणि त्यांना साथ देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी उघडे यांनी केली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उघडे यांनी व्यक्त केला आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page