Monday, April 20, 2026
HomeParbhaniजि. प. व पं. स. निवडणुकीत ४६ उमेदवारांची माघार.
spot_img

जि. प. व पं. स. निवडणुकीत ४६ उमेदवारांची माघार.

जि. प. व पं. स. निवडणुकीत ४६ उमेदवारांची माघार.

Jyotsna Wankhede: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवार, दि.२७ रोजी एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यामुळे ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सेलू तालुक्यातील १५ जागांकरिता एकूण ९७ इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी दुपारी ३ पर्यंत एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज परत घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या १० अशा १५ जागा करिता एकूण ५१ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. आता अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या उमेदवारांना निवडणूक निशाणीचे वाटप करण्यात येणार आहे.सेलू तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील निवडणुकीत उडी घेतलेली आहे. याशिवाय काही अपक्ष रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही दुरंगीच होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page