Wednesday, July 15, 2026
HomeParbhaniफिरता पारायण सोहळा मध्ये पारायणा साठी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाचे वाटप.
spot_img

फिरता पारायण सोहळा मध्ये पारायणा साठी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाचे वाटप.

फिरता पारायण सोहळा मध्ये  पारायणा साठी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाचे वाटप.

डॉ. दिंगबर तुलसीरामजी घोडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू शहरातील नामांकित डॉ. दिगंबर तुलसीरामजी घोडके यांचा दि.12 मार्च रोजी वाढदिवस असल्यामुळे तो त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यांनी आपल्या स्व-खर्चाने  सेलू येथे आयोजित केलेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे आयोजन सातोना रोडवरील मयूर पार्क येथील अलंकापुरी येथे दिनांक 12 मार्च 19 मार्च पर्यंत होणार आहे. ही माहिती असल्यामुळे आपण समाजाचे काही तरी देणे असतो हे जाणून ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्या साठी  येणाऱ्या भाविकांना पारायणासाठी उपयुक्त असा ज्ञानेश्वरी ग्रंथ  भेट द्यावा अशी मनोमनी प्रबळ इच्छा निर्माण झाली. त्या अनुषंगाने  दि. 12 मार्च रोजी आपल्या वाढदिवसा निमित्ताने सकाळी त्यांनी सातोना रोडवरील अलंकापुरी येथे स्वतः उपस्थित राहून येणाऱ्या भाविकांना ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ ज्यांच्याकडे उपलब्ध नाही अशा128 भाविकांना मोफत ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ आनंदाने आणि उत्साहाने सस्नेह भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page