
बल्लारपूर मध्ये गल्लीबोळातळ्या व्यवसायिकावर गॅस एजन्सी मेहरबान
प्रशासन डोळे बंद करून तमाशा पहात आहे
बल्लारपूर मध्ये गल्ली बोळातल्या व्यवसायिकावर गॅस एजन्सी मेहरबान असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यांच्याकडे सातत्याने घरगुती गॅस चा वापर सुरू आहे. त्यांना गॅस एजन्सी गोडाऊन पासून दुकान पोहोच सुविधा चढ्यादरात देणे चालू आहे.
सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्यांनाही सुविधा प्रदान केली जात आहे. मोठमोठ्या गोष्टी सांगणारे प्रशासन डोळे बंद करून तमाशा पाहत आहे, त्यांनी आतापर्यंत एकही घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई केली नसल्याचे चित्र समोर आले आहे.