Monday, August 24, 2026
spot_img
HomeParbhaniसकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे - चैतन्य महाराज देगलूरकर.

सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे – चैतन्य महाराज देगलूरकर.

सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे – चैतन्य महाराज देगलूरकर.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.02 मार्च पसायदान हे मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे.कारण जगता मधील सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे.७०० वर्षांपूर्वीचे पसायदान आणखी सात हजार वर्षे जरी झाले तरी मानवी कल्याणाचा पसायदानात मांडलेला विचार स्वीकारावा लागेल. असे मोलाचे विचार पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूकर यांनी मांडले.येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि 02 एप्रिल ते शनिवार दि 04 एप्रिल दरम्यान ‘पसायदान’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.येथील साईबाबा मंदिरात दररोज सायं 06  ते 08 या वेळेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूकर हे पसायदान यावर पुष्प गुंफत आहेत.यावर्षी ”  किंबहुना सर्व सुखी,पूर्ण होवोनि तिन्ही लोकी,भजिजो आदी पुरुखी,अखंडित” या ओवीवर ते तीन दिवस पुष्प गुंफणार आहेत.प्रवचनमालेचे हे 07 वे वर्ष आहे.आज पहिल्या पुष्पांत पुढे बोलतांना चैतन्य महाराज म्हणाले की,मानवाने देखील संतांची संगती स्वीकारली पाहिजे.माणसाने कर्मठ नसावं पण कर्मनिष्ठ असणे आवश्यक आहे.सर्व सुखांनी तिन्ही लोकी मानवाने पूर्ण व्हावे अशी मागणी पसायदानात केली आहे. पृथ्वी वरील मानवाला संकटांचा सामना करावा लागू नये आणि सर्व मानव जात सुखी व्हावी असं मागण संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात केले आहे.पसायदानातील ‘ किंबहुना ‘ या शब्दाचा सविस्तर अर्थ श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आजच्या प्रवचनात सांगितला.या प्रवचनात अभंग गायन सखाराम उमरीकर,हार्मोनियम वादन शंतनु पाठक,तबला वादन गिरीश दीक्षित,बासरी वादन अर्जुन कसाब आदींनी साथ दिली.सद्गुरू पूजन वसंत प्रतिष्ठान वतीने महेशराव खारकर आणि अँड उमेशराव खारकर यांनी केले.प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले तर पसायदान गायन शरण्या मोहकरे, मनवा देशमुख,आरोही ओगले,यथार्थ गौलवाड आदींनी गायले.प्रवचनाचे सूत्रसंचालन ह.भ.प.प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page