ज्योत्स्ना वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे आजी -आजोबा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम, पर्यवेक्षिका सुनीता कांबळे मॅडम तसेच शबाना मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम आजी आजोबा यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजी आजोबांची भाषणे झाली व आजी-आजोबांचे संगीत खुर्ची यासारखे विविध खेळ घेण्यात आले. अध्यक्ष भाषणामध्ये प्राचार्य असमा खान मॅडम यांनी आजी आजोबांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात आजी- आजोबा म्हणून रामसमुद्री तिवारी, रामदुलारी निषाद, मोरेश्वर गेडाम, दृश्यम गेडाम, रफिक शेख यांची उपस्थिती होती. या सर्वांनी आपला शाळेविषयी अभिप्राय दिला. अशाप्रकारे आजी-आजोबा मेळावा साजरा करण्यात आला.