Saturday, April 18, 2026
HomeChandrapurकर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला...
spot_img

कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार

कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार

नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित

Jyotsna Wankhede:

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे.

दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page