Sunday, May 3, 2026
HomeFestivalsबुद्ध जयंती निमीत्य धम्मप्रबोधन व"बुद्धपहाट" उत्साहात संपन्न
spot_img

बुद्ध जयंती निमीत्य धम्मप्रबोधन व”बुद्धपहाट” उत्साहात संपन्न

बुद्ध जयंती निमीत्य धम्मप्रबोधन व”बुद्धपहाट”  उत्साहात संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय आणि बुद्ध विहार समिति द्वारा बुद्ध जयंती समारोहाचे भव्य आयोजन केले होते. बुद्ध पूर्णिमेच्या पूर्व संध्येला ” भगवान बुद्ध आणि आधुनिक विज्ञान” या विषयावर ज्येष्ठ विचारवन्त आणि धम्म अभ्यासक आयु. रमेशजी कटके (अमरावती) यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्ममित्र भास्कर भगत, प्रा. डॉ. दूधे  यांचे समायोचित मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक जयदास भगत, संचालन संपत कोरडे तथा आभार प्रदर्शन सोनू खोबरागडे यांनी केले. दुस-या दिवशी सन बीट म्यूजिकल ग्रुप नागपुर प्रस्तुत “बुद्ध पहाट” हा सुश्राव्य बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांच्या भव्य उपस्थितिमधे यशस्वीरित्या संपन्न झाला. बुद्ध विहारासमोरिल भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरूवात पहाटे ठीक ५.३० वाजता विहारावरील धम्मध्वजाचे ध्वजारोहण आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन झाली. त्रिशरण पंचशील आणि त्रिरत्न वन्दनेने वातावरण श्रद्धामय झाले. गायकानी सुमधुर आवाजात बुद्ध भीम गीते प्रस्तुत करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकारिता समितिचे अध्यक्ष तुलसीदास खैरे, सचिव जयदास भगत, कोषाध्यक्ष प्रकाश देवगडे, अंबादास मानकर, परमानंद भड़के, गोकुल वाघमारे, बालू महेशकर, अशोक दुपारे, नरेन्द्र जानगे, रवि खोबरागडे, विजय कांबले, रसिका वाघमारे, सोनू खोबरागडे, वनिता नगराले, अपर्णा खोबरागडे, संघमित्रा रंगारी, भगीरथाबाई मून, नीता कोरड़े, विद्या भगत, सुनीता अक्केवार, वछलाबाई ताकसान्डे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिति होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page