Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चे इयत्ता बारावीच्या परीक्षेत...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चे इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चे इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

ज्योत्स्ना वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
बारावीच्या मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित केले. यात विज्ञान विभागातून एकूण 45 विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसल्या होत्या त्यात एकूण 43 विद्यार्थिनी पास झाले असून विज्ञान विभागाचा निकाल 96% लागला. त्यात प्रथम क्रमांक संयोगिता प्रशांत कायरकर   (82), द्वितीय  संबोधी आशिष दुर्गे(77.33) क्रमांक आणि वैष्णवी रमेश कैथल (73.83) तृतीय हिने क्रमांक पटकाविला. तर कला विभागाचा निकाल 66% लागला. त्यात प्रथम क्रमांक लुबैना जाकीर शेख  (68.17), द्वितीय क्रमांक वैष्णवी देवराव बुरेवार (58.67). व वाणिज्य  विभागाचा निकाल 60% लागला.  त्यात प्रथम क्रमांक दुर्गा इरावेना (54.50%), द्वितीय क्रमांक फलकनाझ रजब अली (51.83%) यांनी पटकाविला. तसेच वैष्णवी राजेश शर्मा (51.67%) ही दिव्यांग विद्यार्थी (CWSN) असून हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर चे संस्थापक श्री. जैनुद्दीन जव्हेरी सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page