Tuesday, May 5, 2026
HomeElectionविधानसभा निकालात भारतीय जनता पक्षाचे अभूतपूर्व यश : डॉ. अशोक जीवतोडे
spot_img

विधानसभा निकालात भारतीय जनता पक्षाचे अभूतपूर्व यश : डॉ. अशोक जीवतोडे

विधानसभा निकालात भारतीय जनता पक्षाचे अभूतपूर्व यश : डॉ. अशोक जीवतोडे

पश्चिम बंगाल सह इतर राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा चंद्रपुरात जल्लोष

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे तसेच या अभूतपूर्व यशातील सर्व भाजपचे सन्माननीय पुढारी, सन्माननीय पदाधिकारी व सन्माननीय कार्यकर्ते यांचे हार्दिक अभिनंदन!!!

डॉ अशोक जीवतोडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा 

ज्योत्स्ना वानखेडे:
देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष आज (दि.४) ला स्थानिक नागपूर रोडवर फटाके फोडून, पक्षाचे झेंडे उंचावून व लाडू वाटप करुन जल्लोष करण्यात आला.
देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, आणि पुद्दुचेरी या राज्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालात अभूतपूर्व आघाडी मिळविली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री आदरणीय श्री अमितजी शहा,राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री नितीनजी नबीन,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा श्री रवींद्रजी चव्हाण व भाजपच्या देशातील बड्या सन्माननीय नेत्यांच्या पश्चिम बंगाल व इतर राज्यातील प्रचाराला यश आले असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे. सोबतच या चार राज्यातील विधानसभेत अभूतपूर्व यशाबद्दल त्या-त्या राज्यातील जनतेचे व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ता,व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे या यशाकरीता डॉ. जीवतोडे यांनी अभिनंदन केले.
डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागपूर रोडवर फटाक्यांची आतिषबाजी करुन, पक्षाचे झेंडे उंचावून, लाडू वाटप करुन घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक देवानंद वाढई, आनंद चकीनारपवार, दिलीप कार्लेवार, संदीप देशपांडे, अजय ढिमोले, प्रकाश घाटे, रवि जोगी, मंगेश अहिरकर, आबाजी बाविस्कर, सचिन दिघाडे, मेहता व आदी मोठ्या संख्येने पक्षाचे व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page