Sunday, May 24, 2026
HomeRailwayआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारशाह - मुंबई नवी रेल्वे सेवेला मिळाली...
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारशाह – मुंबई नवी रेल्वे सेवेला मिळाली मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारशाह – मुंबई नवी रेल्वे सेवेला मिळाली मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

आ.मुनगंटीवार यांनी मानले केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार



Jyotsna Wankhede: बल्लारशाह- मुंबई दरम्यान नव्या रेल्वे सेवेच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस या नव्या रेल्वे सेवेच्या संचालनास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी १० मे २०२६ रोजी पत्राद्वारे नवीन २०१०५/२०१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस सुरू करण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने वाढता प्रवासभार लक्षात घेता अतिरिक्त रेल्वे सेवेची गरज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रभावीपणे मांडली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेत नवीन २०१०५/२०१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेसच्या संचालनास मंजुरी दिल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू होणाऱ्या या नव्या रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारपूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबईकडे प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार तसेच भाविकांनाही या सेवेचा मोठा लाभ मिळणार असून या निर्णयाबद्दल जिल्हाभरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांवर आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page