*बल्लारपूर मध्ये नगरपालिका, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय चे कामकाज चालू होते ११ वाजता*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, नगरपालिका, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय या सर्व शासकीय कार्यालयांसाठी कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित करण्यात आली आहे。
कर्मचाऱ्यांना दुपारी १.०० ते २.०० या वेळेत अर्धा तासाची भोजनाची सुट्टी (लंच ब्रेक) देण्यात येते。 हे कार्यालयीन वेळेचे नियम खालीलप्रमाणे आहेत:नवीन कामकाजाचे दिवस: सर्व शनिवार व रविवार कार्यालय बंद असते (पाच दिवसांचा आठवडा)。शिपायांची वेळ: शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायं. ६.३० अशी असते。जेवणाची वेळ: कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाऊ शकत नाहीत。
कार्यालयाचे काम सुरळीत चालू राहावे, यासाठी प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी जाणे आवश्यक आहे。हे नियम २९ फेब्रुवारी २०२० रोजी लागू केलेल्या ५ दिवसांच्या आठवड्याच्या शासन निर्णयावर (GR) आधारित आहेत。 अधिकृत संदर्भ आणि शासन निर्णयाच्या तपशीलासाठी, महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे.
असे असताना बल्लारपूर मधील नगरपालिका, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय मध्ये भेट दिली असता, सकाळी ९.४५ वाजता अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनात आले आहे. शिपायाद्वारे साफसफाई करणे, कुलरमध्ये पाणी भरणे चालू असल्याचे दिसले. शिपायांना, सिक्युरिटीना विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की, कर्मचारी हे १०.३० पर्यंत येतात. अधिकारी ११,१२ वाजता येतात. जनता मात्र ताटकळत राहते. यांचे खरे कामकाज ११.०० वाजता सुरू होत असल्याचे निदर्शनात आले आहे. एकीकडे शासनातर्फे सर्व शनिवार व रविवार सुट्टी, सोमवार ते शुक्रवार पाच दिवस ड्युटी करायची असते त्यातही एक तास उशिरा, ड्युटी सुरू होत असल्याचे लक्षात आले आहे. सदर कार्यालयात फेरफटका मारला असता खुर्च्याखाली दिसत होत्या.