Saturday, June 13, 2026
HomeChandrapur*आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात चंद्रपूर येथे १३ जून रोजी जनजागृती सभा* अनुसूचित जातीतील ५९...
spot_img

*आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात चंद्रपूर येथे १३ जून रोजी जनजागृती सभा* अनुसूचित जातीतील ५९ जातींना सहभागी होण्याचे आवाहन

*आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात चंद्रपूर येथे १३ जून रोजी जनजागृती सभा*

अनुसूचित जातीतील ५९ जातींना सहभागी होण्याचे आवाहन

*📢 जाहीर आवाहन 📢*
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपूर येथे दिनांक २० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५९ जातींच्या संयुक्त महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, आरक्षणाचे अस्तित्व आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी सर्व समाजबांधवांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
*सभेचा तपशील*
📅 दिनांक : १३ जून २०२६ (शनिवार)
🕒 वेळ : सायंकाळी 5.30 वाजता
📍 स्थळ : सिद्धार्थ बुद्ध विहार, s.t. वर्कशॉप्स समोर ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर
_____________________
 मोर्चाची बांधणी आणि आयोजन यावर मार्गदर्शनासाठी नागपुर वरून अमन कांबळे, एड आकाश मून, प्रीतम बुलकुंडे आयोजक, कार्यकर्ते उपस्थित राहतील.
या सभेमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचे परिणाम, समाजाची भूमिका, जनजागृती आणि २० जून २०२६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे युवक, विद्यार्थी, महिला, कर्मचारी, निवृत्त नागरिक व समाजबांधवांनी उपस्थित राहून सामाजिक न्यायाच्या या लढ्याला बळ द्यावे, ही नम्र विनंती.
“आरक्षण वाचवा – संविधान वाचवा”
“एकजूट हाच संघर्षाचा पाया”
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page