Friday, June 19, 2026
HomeChandrapurजागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट; आ....
spot_img

जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट; आ. किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट; आ. किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

चंद्रपूरच्या कन्येच्या जागतिक यशाचा गौरव; मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट, यापूर्वी भाजप महानगर कार्यालयात विशेष सत्कार

Jyotsna Wankhede: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या डॉ. ज्योती (पूजा) देवराव देऊरकर यांचा गौरव करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून मुंबई येथे डॉ. ज्योती देऊरकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ. ज्योती देऊरकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रपूरच्या कन्येने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करून डॉ. ज्योती देऊरकर यांचा सत्कार केला होता.

नुकत्याच अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये जगातील अनेक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ‘ट्विस्टिंग बॉडी इव्हेंट’ प्रकारात डॉ. ज्योती देऊरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे भारतासह महाराष्ट्र आणि चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, डॉ. ज्योती देऊरकर यांचे यश हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि समर्पणाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे. अशा प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी भावना वक्त केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून योगासन क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. ज्योती देऊरकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकून आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्याही भेटी

 

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. ज्योती देऊरकर यांची उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याशीही भेट घडवून दिली. सर्व मान्यवरांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page