भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहरातील सर्व आघाड्यांच्या अध्यक्ष व महामंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
*ज्योत्स्ना वानखेडे*
भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराच्या वतीने सर्व आघाड्यांच्या अध्यक्ष व महामंत्र्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. चंदनभैय्या चंदेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी संघटन बळकटीकरणाबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.
बैठकीत संघटना अधिक सक्षम, सक्रिय व प्रभावी करण्याच्या दृष्टीने विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दि. ७ जुलै ते ११ जुलै २०२६ या कालावधीत सर्व आघाड्यांच्या स्वतंत्र संघटनात्मक बैठका आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. प्रत्येक आघाडीने आपल्या अध्यक्ष व महामंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित दिनांक व स्थळी बैठक घेऊन संघटन विस्तार तसेच आगामी कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणन्जय सिंह यांनी केले. त्यांनी संघटनेची ताकद बूथस्तरावरील सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये असून सर्व आघाड्यांनी अधिक जोमाने कार्य करून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
यावेळी शहर महामंत्री मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, घनश्याम भुरटकर, सतीश कनकम कम, नगर परिषद बल्लारपूर येथील भारतीय जनता पार्टीचे गटनेते तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचा मुख्य उद्देश सर्व आघाड्यांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून संघटनात्मक कार्याला अधिक गती देणे तसेच आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करणे हा होता.