Sunday, July 12, 2026
HomePolice*चंद्रपूर पोलिसांकडून 51 गुन्ह्यातील एकूण 66,14,886/-रु. चा अंमली पदार्थ नाश*
spot_img

*चंद्रपूर पोलिसांकडून 51 गुन्ह्यातील एकूण 66,14,886/-रु. चा अंमली पदार्थ नाश*

*चंद्रपूर पोलिसांकडून 51 गुन्ह्यातील एकूण 66,14,886/-रु. चा अंमली पदार्थ नाश*

*ज्योत्स्ना वानखेडे*: 
दि. 10/07/2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 51 गुन्ह्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा मा. जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती यांच्या परवानगीनंतर नियमानुसार नाश करण्यात आला.
या कारवाईदरम्यान एकूण चंद्रपूर जिल्ह्यातील 51 गुन्ह्यातील
1. *गांजा* 310 किलो 340 ग्रॅम कि. ₹53,02,486
2. *एम.डी. (पावडर)* 420 ग्रॅम कि. ₹13,05,000
3. *गर्द* 76 ग्रॅम कि. ₹7,400
*एकूण किंमत रु ₹66,14,886* रुपयाचा जप्त अंमली पदार्थ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जप्त मादक पदार्थ शासकीय वाहनातून नागपूर येथील बुटिबोरी एमआयडीसीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, प्लॉट क्र. CHW-01, MIDC बुटिबोरी, नागपूर येथे सुरक्षितरीत्या नेण्यात आले. तेथे अत्याधुनिक बॉयलर प्रणालीद्वारे ते सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्णतः भट्टीमध्ये जाळून नाश करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, व श्री. अजिंक्य तांबडे, पो.नि., प्रभारी गृह उपअधीक्षक, मुख्यालय, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
त्यावेळी नोडल अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, पोलीस अंमलदार स.पो.फौ. अरुण खारकर, पो.हवा. सुधीर मत्ते, पो.कॉं. किशोर वकाटे, पो.कॉं. प्रदीप मडावी, पो.कॉं. अमोल साबे, फोटोग्राफर पो.कॉं. वैभव पत्तीवार, चालक पो.हवा. प्रमोद डोंगरे, पो.कॉं. रुपेश वारशिंगे तसेच पो.कॉं. शुभम बल्की यांनी कारवाईत सहभाग घेतला.
चंद्रपूर पोलिसांकडून अंमली पदार्थाविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, समाजात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी अशा प्रभावी उपाययोजना पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page