*जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांचा वचक;* *दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 198 जामीनप्राप्त आरोपींची घेतली ओळख परेड*
*ज्योत्स्ना वानखेडे*
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात मा. ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे थेट उपस्थितीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून जामिनावर सुटलेल्या एकूण 198 आरोपींची विशेष ओळख परेड (कवायत) घेण्यात आली.
*जामीनाच्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे सक्त आदेश:*
सर्व आरोपींची पार्श्वभूमी तपासून त्यांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली असून न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या सर्व अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करावे, अशी कडक सूचना सर्व आरोपींना देण्यात आल्या आहेत. अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यासाठी पोलीस न्यायालयात धाव घेतील, असा इशाराही देण्यात आला.
*सुटलेल्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई:*
या परेड दरम्यान, ज्या जामीनप्राप्त आरोपींवर यापूर्वी कोणतीही प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली नव्हती, अशा सर्व आरोपींची यादी तयार करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जेणेकरून ते भविष्यात पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाहीत.
*गुन्हेगारांवर 24 तास पाळत:*
सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना त्यांच्या हद्दीतील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि ते पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गंभीर गुन्हे करून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे कडक लक्ष असेल. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
————————–
*f:* SP Chandrapur | *Instagram:* chandrapur_police | *X:* spchandrapur