Thursday, July 16, 2026
HomeBhadrawati*गांजा जप्त; पोलीस स्टेशन भद्रावती यांची कारवाई*
spot_img

*गांजा जप्त; पोलीस स्टेशन भद्रावती यांची कारवाई*

*गांजा जप्त; पोलीस स्टेशन भद्रावती यांची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*
अ.क्र. तपशील माहिती
1 **पोलीस स्टेशन** भद्रावती, जिल्हा:- चंद्रपूर
2 **अपराध क्रमांक** **685 /26** कलम 8(क), 20(ब),ii (अ), NDPS Act
3**फिर्यादीचे नाव**
सरतर्फे सपोनि. **संजय मिश्रा** पो.स्टे. भद्रावती
4 **आरोपीचे नाव** **सोनल दशरथ महाकुळकर** वय 20 वर्षे, धंदा-मजुरी, रा. नाग मंदिर मागे शिवाजी नगर भद्रावती जि. चंद्रपूर +1
5 **घटनास्थळ** नाग मंदिर मागे शिवाजी नगर भद्रावती जि. चंद्रपूर 3 कि.मी. पश्चिम
6 **घटना तारीख वेळ** दि. **15/07/2026** चे **16/40** वा ते **18/30** वा दरम्यान
7 **दाखल तारीख वेळ** दि **15/07/2026** चे / वा
8 **मिळून आलेला माल** 1) कि.अं. **₹13,000/-** – गांजा **907 ग्रॅम**
2) कि.अं. **₹30,000/-** – एक जुनी वापरता सॅमसंग कंपनीचा मोबाईल
3) कि. अं. **₹60,000/-** – हिरो होंडा कंपनीची सिडी डिलक्स मो.सा. एम.एच. 31 व्ही.एस. 9063
असा एकूण **₹1,03,000/-** चा माल
*9. हकीकत:-*
हकीकत याप्रमाणे आहे की,  दिनांक *15/07/2026* रोजी पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की, भद्रावती नाग मंदिर मागे शिवाजी नगर येथील राहणारा इसम नाव *सोनल महाकुळकर* हा आपले राहते घरी अवैधरित्या गांजा बाळगुन त्याची विक्री करत आहे.
अशी खात्रीशीर खबर मिळाल्यावरून वरिष्ठांना सदर खबरेची माहिती देवुन पंचनाम्यातील नमुद पंच, फोटोग्राफर तसेच वजन काटा मापारी यांना सुचना देवुन खबरे प्रमाणे भद्रावती नाग मंदिर मागे शिवाजी नगर येथे जावुन सोनल महाकुळकर याचे अंगझडती व घराची झडती घेतली असता त्याची हिरो होंडा कंपनीची सिडी डिलक्स मो.सा. एम.एच. 31 व्ही.एस. 9063 चे हँन्डल वर एका थैलीत एकूण *907 ग्रॅम गांजा* सदृश्य वनस्पती मिळुन आल्याने पो.स्टे. भद्रावती अप क्र. *685 /26* कलम 8(क), 20(ब),ii (अ), NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
*10. कामगिरी :-*
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक *आयुष नोपानी* साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक *ईश्वर कातकाडे*, मा. उप वि. पोलीस अधिकारी वरोरा *संतोष बाकल*, यांचे मार्गदर्शनात तसेच पो.नि. *योगेश्वर पारधी* यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि. *विरेंद केदारे*, सपोनि. *संजय मिश्रा*, पोउपनि *संतोष केदार*, पोउपनि. *गजानन तुपकर*, सफौ. *महेंद्र बेसरकर*, पो.हवा. *अनुप आस्टूनकर*, *गोपाल आतकुलवार*, *लोकेश नायडु*, पो.अं. *खुशाल कावळे*, *योगेश घाटोळे*, *संतोष राठोड*, मपोअं. *रागीनी रायपुरे* पो.स्टे. भद्रावती यांनी केली.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page