Friday, July 17, 2026
HomeCrime*सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी...
spot_img

*सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कारवाई*

*सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी केली कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*
*घटनेचा तपशील:*
 दि. *१६/०७/२०२६* रोजी डी.बी.स्टाफ, प्रो.व्ही, जुगार, रेड, कजमशन व इतर केसेस करण्याकामी पोस्ट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून खबर मिळाली की, एक इसम नाव *शिवशंकर उर्फ भोला सिंग* हा कामगार चौक, चंद्रपूर येथे हातात धारदार शस्त्र घेऊन आरडाओरड करीत दहशत निर्माण करीत आहे.
ही माहिती मिळताच पंचांसह तातडीने कामगार चौक, चंद्रपूर येथे गेलो असता, एक इसम सार्वजनिक रस्त्यावर लोखंडी धारदार शस्त्र बाळगून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना पाहून आरडा-ओरडा करून दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचे दिसून आले. आम्हाला पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेतले.
*आरोपीची माहिती:*
नाव: *शिवशंकर उर्फ भोला विजयपाल सिंग*
वय: ४२ वर्षे
धंदा: मजुरी |  पत्ता: अमौली, गुजेला, कानपूर नगर, उत्तर प्रदेश. ह.मु. कामगार चौक, लालपेठ कॉलरी, चंद्रपूर
*जप्त मुद्देमाल:*
त्याच्या ताब्यातून एक *काळसर रंगाची लोखंडी धातूची धारदार शस्त्र* मिळून आली.
शस्त्राचे वर्णन:
– एकूण लांबी: १५.५ इंच
– मुठीची लांबी: ४.५ इंच
– पात्याची रुंदी: ३ इंच
– पात्याची लांबी: ११ इंच
– अंदाजे किंमत: *₹७००/-*
*गुन्हा नोंद:*
सदर इसमाविरुद्ध *कलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम* अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
*कारवाई करणारी टीम:*
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी* सा. चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक *ईश्वर कातकडे*, उपविभागीय पोलीस अधिकारी *श्री. प्रमोद चौगुले* यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. *निशीकांत रामटेके* यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे व डी.बी. पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page