*अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*
1. *कधी आणि कुठे:*
दिनांक *26/07/2026* रोजी मौजा गांगलवाडी, ता. ब्रह्मपुरी येथून एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी अवैध विदेशी दारू घेऊन आरमोरी, गडचिरोली कडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
2. *कारवाई कशी झाली:*
मा. पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस ठाणे, मेंडकी चौकीच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गांगलवाडी रोडवर नाकेबंदी केली.
संशयित *मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर क्र. MH-34 AM-6730* या गाडीची झडती घेतली.
3. *काय जप्त झाले:*
– गाडीमध्ये एकूण *08 कागदी खोके* होते.
– त्यात *हॉयवर्ड 5000 कंपनीच्या 500 ML च्या 192 सिलबंद बिअरच्या टिनच्या कॅन* होत्या.
– प्रत्येकी 135/- रु प्रमाणे एकूण *25,920/- रु किमतीचा मुद्देमाल*
– तसेच *3,00,000/- रु किमतीची स्विफ्ट डिझायर कार*
– *एकूण 3,25,920/- रु चा मुद्देमाल जप्त* करण्यात आला.
4. *अटक केलेले आरोपी:*
1. *संदीप प्रदीप बंडी*, वय 38 वर्षे, रा. गोकुलनगर, गडचिरोली
2. *दिपक भास्कर जराते*, वय 19 वर्षे, रा. गोकुलनगर, गडचिरोली
या दोघांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथे *गुन्हा रजिस्टर क्र. 959/2026 कलम 65(अ), 83 महा.दा.का.* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. *ही कारवाई कोणी केली:*
मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.