Monday, August 17, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*बाल धम्म संस्कार शिबिर यशस्विरित्या संपन्न*

*बाल धम्म संस्कार शिबिर यशस्विरित्या संपन्न*

*बाल धम्म संस्कार शिबिर यशस्विरित्या संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
    संत तुकाराम महाराज सभागृह, बालाजी वार्ड बल्लारपुर येथे रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 ला स. 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यन्त आयोजित *बाल धम्म संस्कार शिबीर*अतिशय उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाले.
६ ते १६ वर्ष वयोगतातील मूला- मुलींकरिता आयोजित या शिबिरात १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. धम्मचारी पद्मरत्न यांनी ” सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा, सचित्त परियो दपनं, एतं बुद्धान सांसनं” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कोणतेही पाप कर्म न करने, कुशल कर्म संपादन करने,  मनाची (चित्त) शुद्धि करने ही बुद्धाची मूलभूत शिकवण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी हा बुद्ध उपदेश अतिशय मार्मिक शब्दांत आणि ओघवत्या वाणीत  धम्मचारी पद्मरत्न यांनी पटवुन दिला.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने झाली. देवप्रीया रामटेके हिने मराठीतून पंचशील पठन केले व वंश कोट्टावार याने विधायक पंचशील प्रस्तुत केले. आराध्या चौधरी, ह्रदया रामटेके,  क्षितिज बोरकर, शास्वत देवगडे यानी बुद्ध पूजा घेतली. धम्ममित्र दर्शना रामटेके यांनी व्यक्त्याचा परिचय आणि मैत्री भावना ध्यान सराव करुन घेतला. दूस-या सत्रामधे गटचर्चा, खेळ  आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. धम्ममित्र भास्कर भगत यांनी संचालनाची भूमिका पार पाडली.
संपत कोरडे यांनी प्रास्ताविक केले तर जयदास भगत यांनी आभार व्यक्त केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला लोहेश्वर जुमडे, किशोर लोनारे, रवि कांबळे, अरुण गावंडे, गोकुल वाघमारे, प्रकाश देवगडे, नितिन धाबर्डे, तुलसीदास खैरे, अंबादास मानकर परमानंद भडके,राहुल साव,मंगेश रामटेके,विजय कांबळे.आदींनी सहकार्य केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page