Sunday, May 24, 2026
HomeChandrapurमौजा चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड मधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये (संत्रा मार्केट समोर...
spot_img

मौजा चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड मधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये (संत्रा मार्केट समोर नाल्याजवळील) असलेले पी. जे. बिअर शॉपी तसेच पी.जी. बिअर शॉपी हे दोन्ही दुकाने कायमचे बंद करण्याबत.

मौजा चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड मधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये (संत्रा मार्केट समोर नाल्याजवळील) असलेले पी. जे. बिअर शॉपी तसेच पी.जी. बिअर शॉपी हे दोन्ही दुकाने कायमचे बंद करण्याबत.

*ज्योत्स्ना वानखेडे*: चंद्रपूर जगन्नाथ बाबा वार्ड मधील नागरिक खालील प्रमाणे निवेदन सादर करतो ते याप्रमाणे.  मौजा चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असलेले पी.जे. बिअर शॉपी तसेच पी.जी. बिअर शॉपी हे मागील 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहे. सदरहू बिअर शॉपीमध्ये देशी तसेच विदेशी दारू भरपूर प्रमाणात विकत असतात.
सदरहू शॉपींसमोर सकाळी 5 वाजेपासून सायंकाळी 12 वाजेपर्यंत देशी तसेच विदेशी दारू मिळत असल्यामुळे मद्यपींची रांग लागलेली असते. रविवार तसेच बंद असलेल्या दिवशीही तर फारच गर्दी राहते. दोन्ही बिअर दुकानांपुढे मद्यपी लोक रस्त्यावर आपली वाहने ठेवतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत राहते. अशा ट्रॅफिक जाममुळे मागील हफ्त्यात एका बाईचा अपघात होऊन पाय मोडला.
मद्यपी लोक दोन्ही दुकानांजवळ तास तास उभे राहून देशी तसेच विदेशी दारू तसेच बिअरचे मद्यपान करतात व रस्त्यावर प्लॅस्टिकचे ग्लास तसेच त्यांचे पन्नी फेकून देतात व तिथेच लघवी तसेच उलटी सुद्धा करतात. कधी कधी गुंड प्रवृत्तीचे मद्यपी लोक आले तर रस्त्यावर अर्वाच्यपणे अश्लील शिवीगाळ करतात. याबाबतीत सूचना तक्रार केल्यामुळे काही काळापुरते दुकानाला सील लावण्यात आले. परंतु ते पुन्हा सुरू करण्यात आले.
आजही आपले अधिनस्त कर्मचारी यांना पाठवून परिस्थिती पाहिली तर आपणास लक्षात येईल. हे दोन्ही दुकान सोसायटीची परवानगी नसताना सुद्धा जोरजबरदस्तीने सुरू आहे. तसेच दोन्ही दुकानदारांनी बेकायदेशीरपणे दुकानाच्या समोर टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे.
वरील कारणांमुळे वाडीतील महिलांना तसेच नागरिकांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्या दिवशी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही.
करीता  वैष्णवी अपार्टमेंटमधील दोन्ही बिअर शॉपींची दुकाने कायमचे बंद करण्यात यावी. अशा प्रकारची तक्रार मा. महासंचालक,
महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई  यांना देण्यात आलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page