Tuesday, August 18, 2026
spot_img
HomeEducation*सरस्वती विद्यालय मुधोली येथे रानभाजी मेळावा संपन्न*

*सरस्वती विद्यालय मुधोली येथे रानभाजी मेळावा संपन्न*

*सरस्वती विद्यालय मुधोली येथे रानभाजी मेळावा संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
17 ऑगस्ट 2026 रोज सोमवारला सकाळी 11:00 वाजता मुलीच्या शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास भा.खोंड यांनी  पूजन करून रानभाजी मेळाव्याचे उद्घाटन केले.
सरस्वती विद्यालय मुधोलीच्यां सभोवताली असणाऱ्या खेड्यातील विद्यार्थिनींनी स्काऊट गाईडच्या माध्यमातून  विविध प्रकारच्या रानभाज्या आणून प्रदर्शनी मध्ये ठेवल्या.
 प्रत्येक भाजीचे महत्त्व आणि आपल्या शरीराला होणारे फायदे याचे महत्त्व मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना सांगितले.
 आपले आरोग्य सुदृढ राहावं याकरिता प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारी रानभाजी आपल्या दैनिक आहारात घेतली पाहिजे असे त्यांनी संबोधित केले.
 त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्या भाजीचे नाव व त्याचे होणारे फायदे याची माहिती विचारण्यात आली.हा उपक्रम आयोजित करण्यात सौ  डोंगरे मॅडम, दडमल मॅडम व सपना मॅडम यांनी  महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याचप्रमाणे नागपंचमीचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक श्री प्रशांत जांभुळे सर यांनी विद्यार्थ्यांना विषारी सापा पासून आपण स्वतःला कसे वाचवावे,  त्यांची लक्षणे कोणती? तो साप कसा ओळखावा आणि साप चावल्यास प्रथम औषध उपचार करावा मांत्रिका कडे जाऊ नये याबाबत मार्गदर्शन केले.
 विषारी सापाच्या फक्त चारच(04) जाती आहे जे आपल्याकडे आढळतात त्यापासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. साप आपला शत्रू नसून शेतकऱ्याचा मित्र आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. बाकी इतर साप हे बिनविषारी आहे त्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही परंतु भीतीपोटी शेतकऱ्याचा मित्र साप याला विनाकारण लोक मारतात. साप कधीही दूध पीत नाही परंतु अंधश्रद्धेच्या पोटी आपण त्याला  दूध पाजतो परंतु ही एक अंधश्रद्धा आहे. साप कधीच दूध पीत नाही. अशा पद्धतीने त्यांनी नागपंचमीचे निमित्याने सापाचे महत्त्व विशद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री शेख सर, श्री गेडाम सर, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेतील वर्ग 5 ते 10 वी चे विद्यार्थी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page